श्री आदिनाथ बँकेस 2 कोटी 39 लाख रु चा ठोबळ नफा

इचलकरंजी : विजय मकाटे

दि. ५ एप्रिल येथील श्री आदिनाथ को ऑप बँकेला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेची आर्थिक प्रगती झाली असून बँकेला २ कोटी ३९ लाख रूपयांचा ढोबळ नफा झाला असून इतर आर्थिक तरतुदी वजा करता १ कोटी १ लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सुभाष आदिशा काडाप्पा यांनी दिली.

कोरोना परिस्थितीतून संपूर्ण भारत देश सावरत असून आता सर्वत्र आशादायी वातावरण होत असताना दिसत आहे. तथापि रशियन युध्दाचे सावटाने पुन्हा संपुर्ण देशभर आर्थिक स्थित्यांतर निर्माण होईल का असा सभ्रम झाला आहे. अशा परिस्थितीतही आर्थिक प्रगतीमध्ये बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, माझे सहकारी संचालक, बीओएम सल्लागार व कर्मचारी यांच्या सामुदायिक प्रयत्नामुळे बँकेने आपली या वर्षातील कामगिरी उत्कृष्टपणे पार पाडलेली आहे. नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेकडे १३० कोटीच्या ठेवी आहेत. तर ८१ कोटीकर्जाचे वितरण केले आहे. येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांना नवनवीन पेमेंट सेवा व सुविधा उपलब्ध करून देणेचा संचालकांचा मनोदय असलेचे व कमीत कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करणेचा उद्देश असलेचे बँकेचे चेअरमन श्री. काडाप्पा यांनी नमुद केले. यावेळी बँकेचे व्हा. चेअरमन बाळासो कल्लाप्पा केटकाळे तसेच संचालक बाळासो पारीसा चौगुले, कुंतिलालजी पाटणी, रविंद्रकुमार देवमोरे, डॉ. पारिसा बडबडे, बापूसो जमदाडे, चंद्रकांत मगदूम, अभयकूमार मगदूम, गुरुनाथ हेरवाडे, शंकर हजारे, सुचित हेरवाडे, जिनेंद्र खोत, संपत कांबळे तसेच संचालिका सौ. मंगल देवमोरे, सौ. पद्मावती लडगे, व व्यवस्थापक मंडळ सल्लागार मधुकर मणेरे, सुदर्शन खोत, उमेश कोळी तसेच बँकेचे सी.ई. ओ.जे.बी. चौगुले, असि.सीईओ जे.ए.उपाध्ये, मॅनेजर निलेश बागणे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.