इचलकरंजी मर्चंट्स बँकेला १ कोटी ६४ लाखांचा नफा
इचलकरंजी:विजय मकोटे
दि. ६ एप्रिल नुकत्याच संपलेल्या ३१ मार्च २०२२ अखेरच्या आर्थिक वर्षात दि इचलकरंजी मर्चंटस को ऑप बँक लि; इचलकरंजी या बँकेस रु. १ कोटी ६४ लाख ११ हजार चा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन श्री. राजगोंडा पाटील यांनी दिली.
सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या एकूण ठेवी रु. १२३ कोटी ४७ लाख इतक्या झाल्या असून रु.६७ कोटी १५ लाख इतके कर्ज येणे आहे. बँकेची एकूण गुतवणूक रु.५५ कोटी ७३ लाख इतकी असून बँकेचा स्वनिधी रु.१२ कोटी ५० लाख इतका झालेला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रु.१९० कोटी ५६ लाख इतका झालेला आहे.
आर्थिक मंदी तसेच कोरोना महामारीच्या दुस-या लाटेमुळे आलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही बँकेने इचलकरंजी परिसरातील बँकेच्या एकूण ६ शाखेतून सामान्य शेतक-या पासून उद्योजकापर्यंत सर्वांच्या गरजा ओळखून आपल्या नियोजनबद्ध व पारदर्शक कार्यपद्धती मुळे सर्वांच्या विश्वासास पात्र ठरली असून त्यामुळेच सर्वच स्तरावर उत्कृष्ट प्रगती साधता आली आहे असे नमूद केले. बँकेचा सी. आर. ए. आर प्रमाण १५.४९% इतके असून नेट एन.पी.ए. ४.७५% इतका आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यातून आयकर रु.३५ लाख ७० हजार व इतर तरतुदी वजा जाता निव्वळ नफा रु.८९ लाख ०१ हजार इतका झाला असलेची माहिती दिली.
बँकेच्या प्रधान कार्यालयासह एकूण ७ शाखा कार्यरत असून बँकेकडे आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी. एस.एम.एस. बँकिंग, रेशन व गैस सबसिडी, सी.टी.एस. क्लिअरिंग तसेच रूपे ए.टी.एम कार्ड इत्यादी सेवा सुरु असून बँक लवकरच आपले Onsite ATM सुरु करीत आहेत.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब बरगाले, जेष्ठ संचालक श्री. विलासराव गात श्री. इरगोंडा पाटील, चंद्रकांत बिंदगे, राजेंद्र शिरगुप्पे, राजकुमार पाटील, गजानन लोंढे, द मोहिते, व्यंकटेश शहापूरकर, संजय व्हनबट्टे, जयप्रकाश शाळगांवकर, सौ. शोभा क सौ. विजयश्री गौड, बँकेचे जनरल मॅनेजर दिपक काटकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.