भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन इचलकरंजीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा.

इचलकरंजी. विजय मकोटे

      दि. ६ एप्रिल  :भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त आज भाजपा शहर कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच चंद्रकांत चौगुले यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करुन,भाजपा संस्थापक अध्यक्ष  कै.शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस माजी शिक्षण सभापती मनोज साळुंखे, युवा सरचिटणीस प्रमोद बचाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, सरचिटणीस अमर कांबळे अरविंद शर्मा अरुण कुंभार उपस्थित होते.

              भारतीय जनता पार्टी ४२ वा वर्धापन दिन इचलकरंजी शहर कार्यालयामध्ये संपन्न झाला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी,नगरसेवक, आघाडी अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख,आणि बुथ प्रमुख, कार्यकर्ते यांनी आपापल्या घरांवर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावून वर्धापन दिन साजरा करण्यात आले. यावेळी शहर कार्यालय येथे शहराध्यक्ष अनिल डाळ्या व भाजपचे ज्येष्ठ नेते पांडुरंग म्हातुकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनिल डाळ्या यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीची स्थापना स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी अरबी समुद्राच्या साक्षीने समुद्राच्या काठावर १९८० साली भारतामध्ये सर्व राज्यात कॉंग्रेसची सत्ता होती त्यावेळी “अंधेरा हटेगा, सुरज उगेगा, प्रकाश पडेगा, और कमल खिलेगा” अशी भविष्यवाणी स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी केली होती. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर, शेवटी स्वतः” या विचारधारेला समर्पित भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या ह्रदयपूर्वक शुभेच्छा दिल्या. शुन्यातून सुरुवात करत भारतीय जनता पक्षाला जगातील सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता आपण सर्वच जण जनतेनं दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत अंत्योदयासाठी अविरत कार्यरत रहावू यात.

              जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अशी ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आज स्थापना दिवस. राजकारण हे राष्ट्रहितासाठी असावे या विचाराने प्रेरित असणाऱ्या भाजपाला आज सर्व स्तरांमधून पाठिंबा मिळतो आहे. भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नाही तर देशासाठी काहीतरी भरीव कार्य करण्याच्या आंतरिक इच्छेने जोडला गेलेला एक परिवार आहे. अनेक ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची वाढ झाली आहे व यापुढेही होत राहील. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे. राष्ट्रहिताचा घेतलेला वसा पुढे नेत भाजपाच्या यशाची कमान अखंड  उंच राहो या सदीच्छांसह भाजपाचे सर्व कार्यकर्ते,सभासद, नेते आणि समर्थकांना स्थापना दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

तसेच विनोद कांकानी, ऋषभ जैन यांनी कणखर आवाजामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रवास, आज पर्यंत केलेले कार्य मनोगत व्यक्त करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

              यावेळी राजेंद्र पाटील, सतीश पंडित, शशिकांत मोहिते, बाळकृष्ण तोतला, आण्णा आवळे, शिवानंद रावळ, मा.नगरसेवक युवराज माळी, दिपक रावळ, प्रदिप माळगे, सलीम शिकलगार, अरविंद चौगले, संतोष कोळी, प्रदिप कांबळे, अतुल पळसुले, उमाकांत दाभोळे, सतीश भस्मे, सुनील डांगरे, प्रविण रावळ, प्रमोद पाटील, डॉ.राजु पुजारी, सुरेश कराळे,अर्जुन मोरे, अर्जुन शिंदे, जयवंत पाटील, भानुदास तासगावे, सौ. मोरे मॅडम,दौलत पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.