स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ पाच हजार वह्यांचे वाटप
इचलकरंजी: संजय आंबे
दि. १९ एप्रिल भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त स्व. विद्या प्रकाशलाल बोरा यांच्या स्मरणार्थ शहरातील विविध शाळांमध्ये पाच हजार वह्यांचे वाटप महावीर मित्र मंडळच्या माध्यमातून करण्यात आले.
भगवान महावीर जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रथोत्सव मिरवणूकमध्ये या वह्यांचे प्रकाशन प्रकाशलाल, राजेंद्र, प्रितम, प्रफुल्ल, स्वप्निल बोरा, सुमीत मुनोत, मयूर पिपाडा, सुमतीलाल शहा, सौ तृप्ती, सौ. योगिता, गोरी बोरा, सौ मंजू मुथा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महावीर मित्र मंडळचे अध्यक्ष भरत सालेचा, जितू पारख, राजू कांकरिया, विपीन बोहरा, कमलेश चोरडिया, कमलेश तलेसरा उपस्थित होते. मिरवणूकीमध्ये सर्व भाविकांना प्रभावना म्हणुन वही वाटप करण्यात आले.
त्याचबरोबर डॉ. सौ. जया आदिनाथ चौगुले विद्यामंदिरमध्ये गुलाबचंद कोठारी यांच्या शांतीनाथ एज्युकेशन सोसायटी शाळेत दिलीप मुथा यांच्या, नाकोडा विद्यामंदिरमध्ये वर्धमान जैन श्रावक संघाचे अध्यक्ष श्रीकांत चंगेडिया, उपाध्यक्ष जीवनराज पुनमिया, ट्रस्टी जयंती सालेचा, घिसुजी पारख, सुमित मुनोत, अशोक सालेचा यांच्या उपस्थितीत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच समाजाच्या विविध धार्मिक पाठशाळेतही वह्या वाटप आचार्यश्री आनंद युवा मंच आणि महावीर मित्र मंडळ सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचे युवा मंत्री बोरा परीवाराचे प्रितम बोरा यांनी, आपल्या आईने नावाला साजेसे कुटुंबात शिक्षणाची गंगा निर्माण करत दोन भावांना इंजिनिअर बनवले, मला पण ग्रॅज्युएट केले म्हणुन आईच्या स्मृतीप्रित्यर्थ वडिलांच्या इच्छानुसार विद्यादानाचे कार्यात मदत म्हणुन हे कार्य केल्याचे सांगितले. महावीर मित्र मंडळ चे राजू कांकरिया, विपीन बोहरा यांनी पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.