१ मे रोजी कडवईत रिक्षा संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

संगमेश्वर:-साद्दीक नाईकोडी 
संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठ येथे रविवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त रिक्षा संघटनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सनघटनेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी केले आहे .
रिक्षा मालक चालक संघटना कडवई तुरळ चिखली यांच्यावतीने प्रतिवर्षी महाराष्ट्र दिनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते .कोरोनाकाळामध्ये दोन वर्षे यामध्ये खंड पडला होता . यावर्षी कोरोनाचे निरबन्ध शिथिल झाल्यानंतर पुन्हा यावर्षी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे .
सकाळी सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले असून दुपारी १२ ते ३ यावेळात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे .३ते ५ रिक्षा संघटनेचे भजन तर ५ ते ६.३० स्वप्नील चिले यांचा ‘सप्तसुर’
हा गायनाचा कार्यक्रम होईल .६.३० ते रात्री ८.३० या वेळात कडवई पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाचा सामूहिक हरिपाठ होईल . तर रात्री ९.३० वाजता पंचक्रोशीतील गुणवंताचा सत्कार संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न होईल .रात्री १० वाजता अक्षय थिएटर रत्नागिरी प्रस्तुत ‘ महावस्त्रहरण’ या धमाल विनोदी नाटकाचा प्रयोग होईल .
या सर्व कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रिक्षासंघटनेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद चव्हाण व उपाध्यक्ष संदीप चिले यांनी केले आहे .

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.