मणेरे शिक्षण संकुलात महाराष्ट्र व कामगार दिन मोठया उत्साहाने साजरा
कबनूर :प्रतिनिधी
दि १ मे :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ.कुसुमताई बाल मंदिर, प्राथमिक विद्या मंदिर व मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी यांचे संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र व कामगार दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे व संस्थेचे मार्गदर्शक श्री.संजय देशपांडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन व ध्वजारोहण करुन झाली . मा.श्री.सुधाकरराव मणेरे यांनी आपल्या भाषणात बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थी व शिक्षक यांनी बदलावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधावा असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रेमा कांबळे व आभार सौ.सुमन पाटील यांनी केले.
या कार्यक्रमास हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्या सौ. उर्मिला माने , प्राथमिक मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर , उपमुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापुरे, कॉलेज इनचार्ज श्री.मलिक मणेर, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी – विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.