रत्नकृषी महोत्सवाची सांगता

पुढील वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या -मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : अस्लम खान

दि.२२ मे – तीन दिवस चाललेला रत्न कृषी महोत्सवाची सांगता झाली .आगामी वर्षी पर्यटन महोत्सवाची जोड द्या व राज्यातील सर्वोत्तम महोत्सव पूर्वनियोजनात करा, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

तीन दिवसीय महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते.  यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन .पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, पशुसंवर्धनचे धनंजय जगदाळे, बाबू म्हाप आदी उपस्थि होते.

पुढील वर्षी 01 मे रोजी याची सुरुवात होईल असे नियोजन करा, असे सामंत यावेळी म्हणाले.  कृषी व पर्यटन महोत्सव सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरेल असेही त्यांनी सांगितले.

या महोत्सवात 120 स्टॉलधारक तसेच पशूपक्षी प्रदर्शनात राज्याच्या सर्व भागातील पशूपालक सहभागी झाले होते.  यातील विजेत्यांना पुरस्कार व स्मृतीचिन्ह देवून त्यांचा सन्मान अतिथींच्या हस्ते करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.