ताराराणी पक्षातर्फे बाबासाहेब खंजिरे यांची जयंती व पुण्यतिथी साजरी

इचलकरंजी  : विजय मकोटे
 दि. २६ मे :  थोर स्वातंत्र्य सेनानी देशभक्त बाबासाहेब खंजिरे यांची जयंती आणि पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली. सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते बाबासाहेब खंजिरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
ताराराणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमात यावेळी  प्रकाशराव सातपुते, बाळासाहेब कलागते, अरुण आवळे, अहमद मुजावर, सर्जेराव पाटील, महादेव कांबळे, संजय केंगार, चंद्रकांत इंगवले, नरसिंह पारिक, चंद्रशेखर शहा, मुरारजी देसाई, महावीर कुरुंदवाडे, संपत जामदार, महावीर केटकाळे, शैलेश गोरे, नाना पाटील, महावीर केटकाळे, अविनाश कांबळे, प्रशांत कांबळे, सुहास कांबळे, मौला मुजावर, राहुल घाट, राजाराम बोंगार्डे, रमेश पाटील, रंगा लाखे, शिवाजी काळे, शिवाजी माळी, शरद चव्हाण, संजय शिंदे, दत्ता कसलकर, स्वप्निल पाटील, नौशाद जावळे, विजय पाटील, नारायण दुरुगडे, राजू दरीबे, दत्तात्रय कसलकर, बजरंग कुंभार, श्रीकांत टेके, राजू गिरी, अरुण निंबाळकर, वसंत येटाळे, शार्दुल शेटे, दयानंद शेटके, चंद्रकांत कदम, तात्या यादव, राजू माळी, स्वप्निल कुळवमोडे, शांतीनाथ मगदूम, सिद्धार्थ कांबळे, अनिल शिकलगार, श्रीमती नंदा साळुंखे, सुवर्णा लाड, शोभा भाट, तुळसा काटकर आदींसह आवाडे समर्थक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.