कडवई जिल्हा परिषद गटात शिवसंपर्क अभियान मोठ्या जल्लोषात संपन्न

आरवली : सचिन पाटोळे

दि. २७ मे.शिवसेना पक्षप्रमुख व  राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांच्या सूचनेप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात झाली असून रत्नागिरी – सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कडवई जिल्हा परिषद गटामध्ये स्थानिक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष प्रीतम शिंदे व चिटणीस सिद्धेश शिरगावकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलन ,शिवप्रतिमा पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर सर्व मान्यवरांचे जिल्हा परिषद गट कडवईच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व सभापती कृष्णा हरेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला व ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून आपली भूमिका मांडली. यानंतर कडवई जिल्हा परिषद गटाचे मा. जि .प सदस्य व रत्नागिरी जि.प. मा. अध्यक्ष संतोष थेराडे यांनी आपल्या मनोगतात आपण ५ वर्ष केलेल्या कामाचा लेखाजोका सांगितला व शिवसैनिकांचे लाभणारे सहकार्य व प्रेम याबद्दल सर्व शिवसैनिकांना धन्यवाद दिले.

 

तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांनी संतोष थेराडे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. यानंतर सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी स्थानिक लोकाधिकार समितीचे महत्त्व स्पष्ट करत संतोष थेराडे यांच्या कामाचा आढावा घेत त्यांचे कौतुक केले. यानंतर मा. आमदार सुभाष बने यांनी संतोष थेराडे यांच्या कार्याचा आढावा घेत ,कामाची पद्धत, प्रशासनाचा अभ्यास , कार्यकर्त्यांमध्ये मिसळण्याची पद्धत, कार्यकर्त्यांकडून मिळणारे प्रेम याबद्दल समाधान व्यक्त केले. आपला मुलगा रोहन आणि संतोष हे चांगले मित्र असून जिल्हा परिषदेमध्ये दोघांनी ही अभ्यासू जिल्हा परिषद सदस्य म्हणून छाप पाडली असून आपणास त्यांचा अभिमान वाटतो असे विशेष नमूद केले.

स्थानीक लोकाधिकार समितीचे उपाध्यक्ष प्रितम शिंदे यांनी अध्यक्षिय भाषण केले. यामध्ये शिवसेना पक्षाची भूमिका, शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यांचा आढावा घेत या योजना घराघरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले तसेच संघटना वाढवण्यासाठी आणि बळकटीकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी असलेली उपस्थिती व प्रत्येक उपस्थितीत मान्यवरांकडून संतोष थेराडे यांच्या कामाचे कौतुक ऐकून समाधान व्यक्त केले व संतोष थेराडेंच्या रूपाने या जि.प गटासाठी योग्य नेतृत्व मिळाले असून कडवई जि.प गटाला त्यांच्या रुपाने उज्वल भविष्य असल्याचे नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक, सरपंच प्रतिनिधी, शाखाप्रमुख प्रतिनिधी ,विभाग प्रमुख प्रतिनिधी, गाव प्रतिनिधी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला मा. आमदार सुभाष बने  , शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक ,जि.प .मा. अध्यक्ष रोहन बने, तालुकाप्रमुख प्रमोद पवार ,जिल्हा महिला संघटक वेदाताई फडके , स्मिता लाड, मा. सभापती बंड्याशेठ बोरूकर, मा. उपसभापती प्रेरणा कानाल, कडवई सरपंच विशाखा कुवळेकर, कडवई विभाग प्रमुख अनंत उजगावकर, उपविभागप्रमुख अरविंद जाधव ,दिलीप सुर्वे, दता लाखण ,कडवई युवा सेना प्रमुख अजिंक्य ब्रीद, विजय कुवळेकर, प्रभाकर हरेकर प्रदिप चोगले आदी मान्यवरांनी उपस्थिती नोंदवली. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन निलेश कुंभार यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.