संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील कॅप्टन हनीफ खलफे रत्नागिरी काॅग्रेस सचिव पदी नियुक्ती

 

कडवई:-

काँग्रेस पक्षाच्या आदेशान्वये रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी कॅप्टन हनीफ हुसेन खलफे यांची नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्रात कार्यरत नव्या दमाच्या क्रियाशील काॅग्रेस कार्यकर्त्याला संधी देण्यात आली असून वेगवेगळ्या माध्यमातून विविध क्षेत्रात परिचीत तसेच धडाकेबाज काॅग्रेस कार्यकर्ता, अनेक प्रश्नावर लढा देणाऱ्या कसबातील हनीफ खलफे यांची रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

कसबा संगमेश्वर येथील मुस्लीम परिवारात जन्मलेल्या व शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रीय असणारे हनीफ खलफे काॅग्रेस पक्षात वेगवेगळ्या पदावर काम केलेले अनुभव असणारा कार्यकर्ता म्हणूनच पक्ष नेतृत्वाने हनीफजी खलफे यांच्या सक्रीयतेची जाण ठेवत खलफे यांना रत्नागिरी जिल्ह्याच्या काँग्रेस सचिव पदी नियुक्ती करत जमिनीशी नाळ असलेल्या एका अनुभवी कार्यकर्त्याला नवी जबाबदारी दिली आहे.

पक्षाने दाखवलेला विश्वास अन् आलेल्या संधीचं सोनं करत पक्ष वाढीस अग्रक्रम देण्याचा निर्धार व्यक्त करत खलफे यांनी संपूर्ण जिल्हात गावोगावी जावून काम करत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. कॅप्टन हनीफ खलफे यांना रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे।

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.