भरत शिंदे पर्यावरण व पशु संवर्धन राज्यस्तरीय मित्र पुरस्काराने सन्मानित
अतिग्रे: प्रतिनिधी
दि: ५ जून : हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावचे भरत सहदेव शिंदे यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त कार्यालय मिरज, महाराष्ट्र शासन उपवन संरक्षण कार्यालय वन विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा प्राणी प्रतिबंध सोसायटी सांगली, निसर्ग पर्यावरण प्राणी संवर्धन अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार इस्लामपूर येथे सोहळा पार पडला यावेळी माननीय माजी आमदार सुजित मिणचेकर हातकणंगले विधानसभा मतदार संघ, माजी आमदार मा भगवानराव साळुंखे विधान परिषद महाराष्ट्र राज्य,मा प्रा विशाल जाधव संस्थापक अध्यक्ष दिशा एज्युकेशन व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था इस्लामपूर या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला
राजकीय कामातील सामाजिक व पर्यावरण व इतर क्षेत्रात काम करणारे हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे गावचे सुपुत्र मा भरत सहदेव शिंदे यांना राज्यस्तरीय पर्यावरण मित्र पुरस्कार देण्यात आला व सत्कार करण्यात आला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.