सन्मती बँकेस ‘बेस्ट सायबर सिक्युरिटी बँक’ आणि ‘बेस्ट डिजिटल पेमेंट गेटवे सर्व्हिस’ पुरस्कार
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ९ जून : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य सन्मती सहकारी मल्टिस्टेट बँकेला इन्जिनिअस लिडरशिप समिट मुंबई यांच्याकडून बेस्ट सायबर सिक्युरिटी बँक आणि बेस्ट डिजिटल पेमेंट गेटवे सर्व्हिस पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्र व अन्य राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांमधून सन्मती सहकारी बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. हे पुरस्कार टीजीएस बँकेचे डीजीएम राजीव कुमार मिश्रा, नाबार्ड चे डीजीएम प्रकाश दाश व इन्जिनिअस लिडरशिप समिट चे एमडी जाहिद सिद्दीकी यांच्या हस्ते आणि आरबीआय चे निवृत्त अधिकारी दत्तात्रय काळे, एसव्हीसी बँकेचे निवृत्त आयटी अधिकारी रविकिरण मंकीकर, सन्मती बँकेचे ऑडीट विभाग प्रमुख अनंत पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. हे पुरस्कार बँकेचे आयटी मॅनेजर सोमनाथ कुंभार व असिस्टंट आयटी मॅनेजर अनंत गिरमल यांनी स्विकारले.
बँकिंग क्षेत्रात सायबर सुरक्षिततेचे प्रचंड आव्हान निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रासाठी सायबर फ्रॉड, ऑनलाइन हॅकिंग या सततच्या धोक्यांमुळे तसेच कोणत्याही प्रकाराने बँकामध्ये सायबर फ्रॉड होण्याची दाट शक्यता आहे. अशा या वातावरणात बँकेच्या आयटी विभागाने सायबर सुरक्षेसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार बँकेचे स्वतंत्र असे सायबर सुरक्षिततेचे धोरण तयार करून सायबर फ्रॉड, ऑनलाइन हॅकिंग होऊच नये म्हणून स्वतःचे ज्ञान, कौशल्य वापरून सायबर सुरक्षितता जपली आहे. त्यामुळेच आजपर्यंत आमच्या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा सायबर फ्रॉड, ऑनलाइन हॅकिंग होऊ दिलेले नाही. या सर्व बाबींचा विचार व परीक्षण करून हे पुरस्कार बँकेस मिळाले असल्याचे बँकेचे चेअरमन सुनिल मा. पाटील यांनी सांगितले.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमनाथ श्रीपाल कुंभार व अनंत विजय गिरमल यांचा अभिनंदन व सत्कार बँकेमार्फत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन अजित कोईक यांचे हस्ते करण्यात आला. त्यांना सातत्याने सहकार्य करणारे आयटी विभागातील प्रमोद भोजे, कु. अर्पणा कुंभार, कु. नेहा देसाई व बँकेचे पूर्वीचे आयटी मॅनेजर अनंत पुजारी व आयटी विभागास मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांचेही अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे व्हा.चेअरमन महादेव कांबळे, संचालक डॉ. आप्पासाहेब होसकल्ले, असि. सीईओ समीर मैंदर्गी, हेड ऑफिस चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.