काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेचे चिपळूणात धरणे आंदोलन

चिपळूण :-
अपूर्ण बसस्थानकाच्या बांधकामाबाबत राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेने रविवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात धरणे आंदोलन केले. काही वर्षांपासून चिपळूणसह रत्नागिरी बसस्थानकाचे बांधकाम रखडले आहे. यामुळे प्रवाशांना भर उन्हा पावसात उभे राहावे लागत आहे. बांधकामासाठी वापरण्यात आलेले लोखंड देखील गंजून गेले आहे. या परिसरात गवत उगवले आहे.
चिपळूण व रत्नागिरी येथील रखडलेल्या बसस्थानकांची कामे पूर्ण होण्यासाठी काँग्रेससह शेतकरी-कष्टकरी संघटनेने काँग्रेसचे नेते व शेतकरी-कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी येथील बसस्थानकात धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांशी चर्चा केली.या आंदोलनामध्ये काँग्रेसचे कोकण विभागिय समन्वय सुनिलभाऊ सावर्डेकर, ज्येष्ठ नेते सुधीर दाभोळकर, माजी तालुकाध्यक्ष ॲड. जीवन रेळेकर, विधान सभा क्षेत्राध्यक्ष महादेव चव्हाण, माजी नगरसेवक सुरेश राऊत, युवक जिल्हाध्यक्ष अल्पेश मोरे, यश पिसे, विश्वनाथ किल्लेदार, चंद्रकांत पेवेकर, रविंद्र विश्वकर्मा, मोहन चव्हाण, मैनुद्दीन सय्यद, राजेंद्र भुरण, वासुदेव मेस्त्री, राजाराम साळुंखे, यशवंत फके, शिवाजी फके, बशीर बेबल, सुनिल भुरण, प्रकाश साळवी आदी उपस्थित होते, तर माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण अर्बन बँकेचे संचालन सतिश खेडेकर यांनी उपस्थिती दाखवत पाठिंबा दर्शविला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.