‘गोकुळ’चे चालते बोलते माहितीपुस्तक म्हणजे एस.एम.पाटील

संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील यांचा सेवानिवृती निमित्‍त सत्‍कार

कोल्‍हापूरः प्रतिनिधी

दि..०२ जुलै :कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ लि.,कोल्‍हापूर (गोकुळ)संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील हे ३८ वर्षाच्या प्रदिर्घ संघ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले बद्दल संघाच्या वतीने चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीत सत्‍कार करण्‍यात आला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले कि एस.एम.पाटील म्‍हणजे गोकुळचे एक चालते बोलते माहिती पुस्‍तक होते.

१९६३ पासुन संघाचा इतिहास माहित असणा-या अधिकाऱ्याच्या पैकी एक अधिकारी होते.त्‍यांच्‍या कडे असणारे बौध्दिकज्ञान,जिज्ञासुवृत्‍ती, कार्यकौशल्‍य यामुळे त्‍यांना संघ कामकाजातील विषयाचे आकलन त्‍यांना त्वरित होत असे, त्यामुळे संघाच्‍या निर्णय प्रक्रिया योग्‍य व अचुक होण्‍यासाठी त्‍यांच्‍या कौशल्‍याचा उपयोग झाला आहे. असे आहे.असे मनोगत व्‍यक्‍त केले व त्‍यांना दिर्घायुष्‍य लाभो अशा शुभेच्‍छा दिल्‍या.
त्यांच्या या ३८ वर्षाच्या प्रवासात ८ चेअरमनसो, ७० संचालक,११ कार्यकारी संचालक यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांचे इतर अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार विभागातील अधिकारी,दूध उत्‍पादक, दूध संस्‍था यांच्याशी असणारे सौहार्दपूर्ण संबंध यांचा संघाच्‍या कामकाजात चांगल्‍या प्रकारे उपायोग झाला आहे.
सत्‍कारास उत्‍तर देताना एस.एम.पाटील म्‍हणाले कि गोकुळमुळे माझ्या परिवाराचे गोकुळ झाले असून त्‍याचे मला समाधान आहे. भविष्‍यात गोकुळची प्रगती दिपस्‍तंभासारखी सदैव तेवत राहील अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
यावेळी माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. व आभार शशीकांत पाटील-चुयेकर यांनी माणले.
यावेळी संघाचे विश्‍वास पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळ, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजीत तायशेटे, अजित नरके,नविद मुश्रीफ, शशीकांत पाटील-चुयेकर,किसन चौगले,रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे,कर्णसिंह गायकवाड,संभाजी पाटील,प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर,अमरसिंह पाटील, बयाजी शेळके,अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, तज्ञ संचालक युवराज पाटील,संचालिका अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.