पैसा फंडची हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत परिसरात प्रभातफेरी
संगमेश्वर:(साद्दीक नाईकोडी)
आपला देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे.प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले असल्याने याच पार्श्वभूमीवर व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या वतीने संगमेश्वर परिसरातून आज प्रभातफेरी काढण्यात आली.
यावेळी ढोलाच्या गजरात आझादी का अमृत महोत्सवी वर्षा निमित्त घोषणा देण्यात आल्या.तसेच घोषवाक्यांचे विविध प्रकारचे फलकही तयार करण्यात आले होते.यावेळी संस्था सचिव धनंजय शेट्ये शाळेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर,पर्यवेक्षक दिलीप मोरगे,शिक्षक नवनाथ खोचरे,किशोर नलावडे आदी शिक्षक वर्ग,शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभात फेरी मध्ये सहभाग घेतला.पैसा फंड इंग्लिश स्कूल,रामपेठ,बाजारपेठ मार्गे संगमेश्वर बसस्थानक अशा मार्गावरुन ही प्रभातफेरी मोठ्या जल्लोषात संपन्न झाली.तत्पूर्वी शुक्रवारी केंद्रशाळा संगमेश्वर येथे संपन्न झालेल्या चित्रकला,घोषवाक्य , निबंध,वक्तृत्व अशा विविध स्पर्धेत पैसा फंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी यामध्ये उज्वल यश देखील संपादित केले आहे . यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.