जि. प.शाळा साखरपा न.१ यांच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत परिसरात प्रभातफेरी,आझादी का अमृत महोत्सव विषयावर वक्तृत्व स्पर्धा
देवरुख:
आपला भारत देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम सर्वत्र राबवली जात आहे.त्यांच्याकडून प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.त्याच पाश्र्वभूमीवर जनजागृतीसाठी जि. प शाळा साखरपा न.१ यांच्यावतीने परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी ढोलाच्या गजरात आझादी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घोषणा देण्यात आल्या.तसेच घोषणा फलक तयार करण्यात आले होते. शाळेपासून साखरपा बस स्थानक परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेचे शिक्षक सौ. यशवंतराव मॅडम,चव्हाण सर, लाड सर, कुवळेकर सर,सायली शिंदे मॅडम आदींच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत या प्रभात फेरी काढण्यात आली.
या मोहिमे अंतर्गत शाळेच्या सभागृहात वक्तृत्व स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत तनिष नितीन वाडेकर(प्रथम),समर्थ अनिल पाटील( द्वितीय), मदन मिलिंद रेमणे व अथर्व राजकुमार कोष्टी (तृतीय) क्रमांक पटकावला.शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी करण्यात आली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.