रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कडवई धरण पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र बिंदू

 

कडवई: साद्दीक नाईकोडी
पावसाळ्यात कोकणात निसर्ग बहरतो. नदी-नाल्यांची खळखळ,ओसंडून वाहत असतात.कोकणातील पाऊस हा सर्वांनाच आवडतो,विशेष:ता कडवई धरण भरुन बाजूने ओसंडून वाहणारे पाणी बघण्याचा मौज मजा वेगळाच असतो.
कोकणचा पावसाळा अनेकांना आवडीचा आहे. अलिकडच्या काही दिवसांत कडवई धरणावर पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे.सर्वत्र दिसणारी हिरवळ, हिरवीगार झालेली झाडे, झोडपणारा पाऊस आणि धरणाच्या एका बाजूने कड्यावरून कोसळणारे पाणी हे अनेकांना आकर्षित करीत असतात. हिवाळा आणि उन्हाळ्यात कडवई धरणावर पर्यटकांना आकर्षून घेत असतात.मात्र,अलिकडच्या काही दिवसांत पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची संख्या वाढती आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.