रक्षाबंधन / नारळी पौर्णिमाच्या दिवशी संगमेश्वरात प्रतिवर्षी प्रमाणे नारळ फोडण्याची स्पर्धा
कडवई : साद्दीक नाईकोडी
हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात. याच दिवसाला‘रक्षाबंधन’म्हणतात.श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.संगमेश्ववरात दरवर्षी या दिवशी बाजारपेठेत हातात नारळ घेऊन फोडण्याचा खेळ खेळला नारळावर नारळ मोठ्याने आपटून तो हातावरच फोडण्याचा स्पर्धकांचा प्रयत्न असतो.

प्रत्येक स्पर्धक जिंकलेले वीस ते पंचवीस नारळ आपल्या घरी घेऊन जातात.ही स्पर्धा मंगेश कांदळगावकर यांच्या हाॅटेलच्या बाहेर सकाळ पासून संध्याकाळपर्यंत सुरु असते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.