५६ व्या स्टेट कॅरम चॅम्पियन स्पर्धेत सलग पाचव्यांदा रत्नागिरीच्या आकांक्षा उदय कदम चॅम्पियन
रत्नागिरी:
पाल घर येथे आयोजित करण्यात आलेल्या 56 व्या महाराष्ट्र स्टेट कँरम चँम्पीयनशिप कँरम स्पर्धा २०२२-२३ मध्ये सलग पाचव्यांदा ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.अंतिम सामान्यात राष्ट्रीय विजेती आयेशाला 25-12 व 20-14 अशा सरळ दोन सेट मध्ये पराभूत करत इतिहास रचला.उपांत्य फेरीत राष्ट्रीय विजेती निलम घोडकेला सलग दोन सेट मध्ये केले पराभूत केले.ह्या स्पर्धेचे आयोजन पालघर विरार कॅरम व महाराष्ट्र राज्य कॅरम असोशिअन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.या स्पर्धेत दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते.
आकांक्षा उदय कदम हिने या आधी सुद्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली छाप उमटवली आहे.या आधी सावंतवाडी,दादर जिमखाना,बोरीवली,विलेपार्ले या आधीच्या सलग चार स्टेट चॅम्पियन व अताची ५ वी स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे.कॅरम क्वीन अशी तिची संपूर्ण राज्यभरात ओळख आहे.या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ बविआ संस्थापक व आमदार भाई ठाकूर यांच्या हस्ते झाला.या यशात आई,वडील,भाऊ,राष्ट्रीय खेळाडू असलेले तिचे मामा देवरुखकर,मित्रमंडळी यांचा असल्याचे सांगितले.या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.