मोटरसायकल व डंपर चोरीतील दोन आरोपी जयसिंगपूर पोलिसांनी केले जेरबंद
३२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त
जयसिंगपूर : विजय मकोटे
दि. ६ सप्टेबर :जयसिंगपुर पोलीस ठाणे कडील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल व डंपर चोरीतील दोन आरोपी जेरबंद करून त्याचेकडुन 2,50,000/- किंमतीच्या सहा मोटरसायकल व 75,000/- रुपये किंमतीचा डंपर असा एकूण 3,25,000/- किंमतीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जयसिंगपूर पोलिसांना यश आले आहे.
जयसिंगपुर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नं 298/2022 भा द वि स क 379 प्रमाणे दिनांक 03/09/2022 रोजी मोटर सायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने जयसिंगपुर पालास ठाणेचे माननीय पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत गुन्हे शोध पथकास आदेशीत केले प्रमाणे जयसिंगपुर गुन्हे शोध पथक जयसिंगपुर शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे शोध पथकात माहिती मिळाली की, सदर गुन्हा 1) विनोद बाबु जाधव. व. व. 22, 2) सुनिल रामाप्पा गावडे.व.व. 26 दोघे रा. नादणी नाका, लमाणी वसाहत, ता. शिरोळ, जि. कोल्हापुर, यांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेवुन त्यांचे कड़े तपास केला असता त्यांनी वरील दाखल असलेले गुन्हा केलेचे कबुल केले तसेच इतर ठिकाणाहुन 5 मोटर सायकल व जयसिंगपुर पोलीस ठाणे गुर नं 152/2022 भा द वि स क 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील डंपर चोरी केलेबाबत कबुली दिलेने त्यांचेकडुन 2,50,000/- किंमतीच्या 6 मोटरसायकल, जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई माननीय पोलीस अधिक्षक श्री. शैलेश बलकवडे सो, कोल्हापुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, गडविभाग कॅम्प इंचलकरंजी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर वैजणे, जयसिंगपुर विभाग जयसिंगपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, जयसिंगपुर पोलीस ठाणे, पोसई प्रमोद वाघ, महिला पोसई स्नेहल टकले, सहा फौजदार सुरेश कोरवी, म पो हे काँ 260 प्रभावती सावंत, पो हे काँ 806 निलेश मांजरे, पो ना 2514 सुरेश तोडकर, पो काँ 885 संदेश शेटे, पो काँ 1333 रोहित डावाळे, पो काँ 2545 वैभव सुर्यवंशी, पो का 2349 सचिन चौगुले, पो को 2568 काशिराम कांबळे यांनी केली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.