कोल्हापूरच्या कलाकारांनी रस्त्यावरच भरवला कलाबाजार
राज्यातील सर्वच नाट्यगृहे सुरु करावीत या मागणिकडे लक्ष वेधण्यासाठी कलाबाजाराचे आयोजन
कोल्हापूर: रेणू पोवार बुधवार दि.15/9/21 रोजी रंगकर्मी कोल्हापूर तर्फे केशवराव भोसले नाट्यगृहासमोरील रस्त्यावर सांस्कृतिक कलाबाजार भरवला होता.सलग आठ दिवस कालबाजाराचे आयोजन करून त्याची सांगता झाली. सदर कलाबाजारचे आयोजन सुनिल घोरपडे, प्रसाद जमदग्नी, धनंजय पाटील, समीर पंडितराव, समीर भोरे, मुकुंद सुतार, रोहन घोरपडे ,मनोज जोशी,राहुल राजशेखर, यांनी केले.यावेळी नृत्य, नाट्य, संगीत या प्रकारातील सादरीकरण कलाकारांनी केले.सरकाराचा सांस्कृतिक विभाग हा काही कामाचा नाही.इतर विभाग जसे आपत्ती व्यवस्थापन आणि उपाययोजना करतात तसे सांस्कृतिक विभाग करीत नाही हा अनुभव आता सर्वांना आलेला आहे त्यामुळे तो बंद करावा अशी मागणी सुनिल घोरपडे यांनी केली.सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी आणि राज्यातील सर्वच नाट्यगृहे सुरु करावीत या मागणिकडे लक्ष वेधण्यासाठी गेला आठवडाभर कलाबाजाराचे आयोजन केले होते.
या संपूर्ण कलाबाजार आठवड्यावेळी ध्वनी व्यवस्था श्रीधर जाधव, रमेश सुतार, गणेश साळोखे यांनी पाहिली.नितीन कुलकर्णी, अभिजीत कोसंबी, सागर बगाडे, श्रद्धा शुक्ल, अविनाश गायकवाड, शिवम मगदूम, महेश सोनुले, वेदा सोनुले, वैदेही जाधव, रविकुमार सुतार, रणजित बुगले, सुरज नाईक, झंकार सुतार, जितू पाटील, मंजिरी देवन्नावर,भाग्यश्री चरणकर,गोविंद सुतार, शाहीर रंगराव पाटील, यशपाल, रफीकुमार, मुस्तकीम, वेद मोरे, प्रकाश गवळी,सोनाली रायकर,स्वानंद जाधव, भार्गव कांबळे, गुरुप्रसाद ढोले,अनिकेत ससाणे,विक्रम पाटील यांनी कला बाजारात सादरीकरण केले.यावेळी रंग-वेशभूषा सुनिल मुसळे,स्टेज व्यवस्था सागर भोसले, मिलिंद अष्टेकर,व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी अनिल कटकुळे,यांनी पहिली.कलापथक निर्माता संघ, मावळा कोल्हापूर,सत्य जय कला पथक निर्माता असोसिएशन कोल्हापूर यांनी पाठिंबा दिला.चंद्रकांत पाटील, संग्राम भालकर ,स्वप्निल माळी, सीमा मकोटे, उमा नामजोशी, व इतर कलाकार यावेळी उपस्थित होते.
कागल, इचलकरंजी, सांगली, निपाणी येथील कलाकारांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.