मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी खेळ व कला स्पर्धा काळाची गरज

अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल

सांगली:प्रतिनिधी 

दि. १ जानेवारी  :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल यांनी व्यक्त केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित बालमहोत्सवाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याहस्ते दादुकाका भीडे संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिसांगली दि. 31 (जि.मा.का.) :- ज्ञान संपादनाबरोबरच शरीर सौष्ठव, शरीर संपदा सुद्धा आवश्यक आहे. खेळ आणि कलेतून मुलांचा व्यक्तीमत्व विकास होतो. यासाठी बाल महोत्सवासारखे उपक्रम काळाची गरज असल्याचे मत अप्पर पोलीस अधीक्षक आचंल दलाल यांनी व्यक्त केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित बालमहोत्सवाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याहस्ते दादुकाका भीडे संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार, दादूकाका भिडे संस्थेचे मानद सचिव सुनिल कोरे, बाल न्याय मंडळाचे सदस्य उदय जगदाळे, जयश्री पाटील, शिवकुमारी ढवळे, आयेशा दानवडे, दिपाली खेरमोडे उपस्थित होत्या.

बाल महोत्सव उद्घाटनानंतर श्रीमती दलाल यांनी महोत्सवामध्ये सहभागी मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सी.आय.ए. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दादूकाका भिडे संस्थेत सुरू करण्यात आलेल्या काँम्पुटर लँब व सुंदराबाई मालू संस्थेत सुरू करण्यात आलेल्या शिवणकला मशिनचे उद्घाटन श्रीमती दलाल यांच्याहस्ते करण्यात आले.

बालमहोत्सवासाठी जिल्ह्यातील 13 संस्थांचे मुले, मुली, जिल्हा आणि परिविक्षा अनुरक्षण संघटना मुलां व मुलींचे बालगृह व निरिक्षण गृह येथे सहभागी झाली आसून 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 पर्यंत विविध मैदानी खेळ , बौध्दीक खेळ, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, इत्यादी स्पर्धा होणार आहेत.

या कार्यक्रमास शासकीय मुलींचे बालगृह मिरजचे अधिक्षक डी. एस. तिरमके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासो नागरगोजे, बापूसो खोत, सर्व तालूका संरक्षण अधिकारी, अधिक्षक श्री. कुलकर्णी, प्रतिभा भंडारी आदि उपस्थित होते.कारी सुवर्णा पवार, दादूकाका भिडे संस्थेचे मानद सचिव सुनिल कोरे, बाल न्याय मंडळाचे सदस्य उदय जगदाळे, जयश्री पाटील, शिवकुमारी ढवळे, आयेशा दानवडे, दिपाली खेरमोडे उपस्थित होत्या.

बाल महोत्सव उद्घाटनानंतर श्रीमती दलाल यांनी महोत्सवामध्ये सहभागी मुलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सी.आय.ए. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून दादूकाका भिडे संस्थेत सुरू करण्यात आलेल्या काँम्पुटर लँब व सुंदराबाई मालू संस्थेत सुरू करण्यात आलेल्या शिवणकला मशिनचे उद्घाटन श्रीमती दलाल यांच्याहस्ते करण्यात आले.

बालमहोत्सवासाठी जिल्ह्यातील 13 संस्थांचे मुले, मुली, जिल्हा आणि परिविक्षा अनुरक्षण संघटना मुलां व मुलींचे बालगृह व निरिक्षण गृह येथे सहभागी झाली आसून 31 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023 पर्यंत विविध मैदानी खेळ , बौध्दीक खेळ, निबंध, चित्रकला, वक्तृत्व, इत्यादी स्पर्धा होणार आहेत.

या कार्यक्रमास शासकीय मुलींचे बालगृह मिरजचे अधिक्षक डी. एस. तिरमके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाबासो नागरगोजे, बापूसो खोत, सर्व तालूका संरक्षण अधिकारी, अधिक्षक श्री. कुलकर्णी, प्रतिभा भंडारी आदि उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.