आदित्य ठाकरेंचा आणखी एक शिलेदार रुसला

उचलले मोठे पाऊल

मुंबई: प्रतिनिधी

दि.२७: शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. राहुल कनाल हे युवासेनेत नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल कनाल हे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. राहुल कनाल हे कोअर कमिटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून अचानक लेफ्ट झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अतंर्गत कुरघोडींना कंटाळून राहुल कनाल यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी राहुल कनाल यांची ओळख आहे. मविआची सत्ता असताना राहुल कनाल यांची शिर्डी संस्थानावर सदस्य म्हणून वर्णी लागली होती. त्यांनी वांद्रे पश्मिमधून विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती. विधानसभा निवडणूक लढवण्यास ते इच्छूक होते. मात्र युवासेनेत सुरू असलेल्या अंतर्गत कुरघोडींमुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. ते अचानक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

दरम्यान राहुल कनाल यांनी अतंर्गत कुरघोडीला कंटाळून कोअर कमिटीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडल्याची चर्चा आहे. राहुल कनाल यांच्याप्रमाणेच युवासेनेचे आणखी काही जण नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अमेय घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.