महानगरपालिकेच्या जलवाहिनीला गळती ..

लाखो लिटर पाणी रस्त्यावर, कृष्णा पंचगंगा नदीचे पाणी गटारीत

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि:२८: इचलकरंजी येथील स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयाच्या समोर महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत होते . तासाभरापूर्वी केलेल्या रस्त्याचे पॅच वर्क ही उखडले.photo

स्टेशन रोडवरील रस्त्या च्या पॅचवर चे काम सुरू आहे सकाळी केलेला रस्ता तासाभरातच उखडला आहे .यामुळे रस्त्याच्या कामाचा दर्जा, त्याचबरोबर महापालिकेने जलवाहिनीसाठी वापरलेल्या पाईपची दर्जा निकृष्ट असल्याचे दिसून येते .

रस्त्यावरून लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यानंतर याबाबतची कल्पना पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ जल अभियंता दिले असता, शहरांमध्ये दहा ठिकाणी उपसा पंप सुरू असून नेमकं कोणता पंप बंद करावा याबाबत आपल्याला माहिती नाही तसेच सर्व पंप बंद झाले तर शहरातील पाणीपुरवठा बंद होईल ,त्यामुळे याची माहिती घेऊनच सदरचे पाणी उपसा बंद करण्यात येईल असे वरीष्ठ जल अभियंता कडून सांगण्यात आले . उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत नागरिकांना पाणी साठी वणवण करावं लागतं अशातच महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागल्यास नागरिकांच्या वरती पाण्याकरिता अतिप्रसंग ओढावेल याची दक्षता घेऊन पालिका प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जलवाहिनी आणि शहरात केले जाणारे रस्त्याच्या पॅच वर्कच्या  दर्जा कडे लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांच्यातून बोलले जात आहे        महावितरण कार्यालयाच्या बाहेरील संरक्षण भिंतीवरती पाणी वाचवा जीवन वाचवा अशा स्वरूपाचा सामाजिक संदेश देणारा फलकाची जाहिरात केली आहे  हा संदेश असणाऱ्या भिती समोरून च लाखो लिटर पाणी वाया जात होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.