स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन
शिरोळ:प्रतिनिधि
दि:२८:श्री दत्त साखर कारखान्याचे आद्य संकल्पक स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली.
याप्रसंगी दत्त उद्योग समुहाचे चेअरमन उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. श्रीमंत विश्वासराव संताजीराव घोरपडे (दत्तवाडकर सरकार) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व.दिनकररावजी यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक अॅड.प्रमोद वसंत पाटील, स्व.सा.रे.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक विजय सूर्यवंशी यांनी व स्व.दत्ताजीराव कदमआण्णा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक निजामसो गौस पाटील भैयासाहेब यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलकुमार यादव शेखर पाटील,दरगु गावडे बाळासाहेब बनगे व इतर मान्यवर तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.व्ही.पाटील, सचिव अशोक शिंदे, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, वर्क्स मॅनेजर एस.एच.संकपाळ, मॅनेजर (फायनान्स) एस.एस.भोसले, प्रॉडक्शन मॅनेजर विश्वजीत शिंदे, सिव्हील इंजिनिअर (प्रोजेक्ट) एल.पी.पाटील, सिव्हील इंजिनियर यशवंतराव माने, पर्यावरण मॅनेजर एस.टी.पाटील, लेबर वेल्फेअर ऑफिसर जे.बी.देसाई, परचेस ऑफिसर व्ही.टी.माळी, डिस्टीलरी मॅनेजर संजय यादव, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, स्टोअर्स किपर एस.व्ही.शिंदे,गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, आयटी मॅनेजर एस.आर. पोतदार, हेडटाईम किपर आर.एम.केरीपाळी, सॉईल केमिस्ट ए.एस.पाटील, इनचार्ज गोडावून आर.एस.पाटील, केनयार्ड सुपरवायझर जे.एच.जाधव, सुरक्षा अधिकारी एस.व्ही.घारगे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही.आर.इंगळे, तसेच अशोक निर्मळे,चंद्रकांत दाभाडे,अशोक माने,महादेव माने याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ, श्री दत्त भांडार या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.