सांगली:प्रतिनिधि
दि:३०:मे: रस्त्यावर अंडा भुर्जीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. 3 अज्ञात हल्लेखोरांनी युवकाची हत्या करुन चालवत असलेल्या गाड्याचीही तोडफोड केली आहे. ही घटना सांगलीतील शंभर फुटी रोडवर घडली. संतोष पवार असं खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सांगलीतील विश्रामबाग शंभर फुटी रोड वर असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाजवळ संतोष पवार हा अंडा भुर्जीचा व्यवसाय करत होता. छोट्या चारचाकी गाडीमधून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. रविवारी संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास आलेल्या 3 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी संतोष पवार याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संतोषचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर हल्लेखोरांनी संतोषच्या चारचाकी वाहनाचीही तोडफोड करत साहित्य रस्त्यावर फेकून दिले आहे.
अंडा भुर्जी चालक खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या चार तासात संशयित आरोपींना गजाआड केले आहे गाडी ओव्हरटेक करण्याच्या झालेल्या वादातून कानाखाली लगावण्यात आली होती. त्याच रागातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या खून प्रकरणाचा तपास गतीने करत अवघ्या चार तासात पाच संशयित आरोपींना गजाआड केले आहे. आकाश शिंदे (वय 19), वैभव शिंदे (वय 23), निहाल नदाफ (वय 23), अकिब नदाफ (वय 20) आणि सफवान बागवान (वय 21), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
-काही दिवसांपूर्वी संतोष पवार आणि संशयित आकाश शिंदे यांचा शहरातील एसटी स्टँड परिसरात गाडी ओव्हरटेक करण्यात यातून वाद झाला होता. यावेळी संतोष पवार यानेआकाश शिंदे याच्या कानाखाली लगावली होती. याप्रकरणी मयत संतोष पवार याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती. तर, आपल्या कानाखाली लगावल्याचा राग आकाश शिंदे याच्या मनात होता. याच रागातून आकाश शिंदे याने आपल्या साथीदारांच्या समवेत संतोष पवार याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.