सही पोषण देश रोशन

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्वत्र पोषण अभियान कोल्हापुरात संपन्न

कोल्हापूर: रेणू पोवार
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सही पोषण देश रोशन हा उद्देश ठेवून एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्वत्र पोषण अभियान अंतर्गतसोमवार दि.२० सप्टेंबर रोजी बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर (नागरी), बिट क्रमांक ४ मध्ये बालाजी पार्क, कोल्हापुर येथे पोषण माह-२०२१ कार्यक्रम घेण्यात आला.
मा. श्रीमती निवेदिता महाडीक (बालविकास प्रकल्प अधिकारी, कोल्हापुर नागरी), श्रीमती नंदा पाटोल (मुख्यसेविका) यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री.धनेश्वर बागल (गट प्रवर्तक), शिवाजी तुपारे, सौ.सुनिता शिवप्रसाद घोडके (सचिव विमल फौंडेशन), सौ. सरिता अजित पवार (सचिव शिवांजनी फौंडेशन), सौ.शकुंतला मोरे (मुख्यध्यापिका शाळा नं. ३०), श्रीमती विमल गवळी, श्री. शितल मराठे, श्री.अतुल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

सदर कार्यक्रमात प्रास्ताविक नंदा पाटील (मुख्यसेविका) यांनी केली तसेच श्रीमती निवेदिता महाडीक (बाल विकास प्रकल्प अधिकारी) यांनी पोष्टीक आहारा बाबत पालकांना मार्गदर्शन व जनजागृती केली.
या कार्यक्रमात पोषण पालखीचे आयोजन करुन लेझीम खेळाव्दारे पोषणाबाबत व पोष्टीक आहाराचे महत्व पटवून देण्यात आले.कार्यक्रमात सॅम, मॅम, गरोदर व स्तनदा माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी पोष्टीक पाककृती स्पर्धा घेण्यात  आल्या.  तसेच पालकांच्यामध्ये पोषणाबाबत जनजागृती  व कुपोषणाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करणारी पालकांची प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमात आभार प्रदर्शन श्रीमती रेखा काटकर अंगणवाडी सेविका यांनी मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.