बायकोला चार मित्रांसोबत बाहेर न्यायचा अन.., पुण्यात वर्षभर सुरु होता प्रकार
पुणे:प्रतिनिधि
दि:०१:जुलै:पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका पतीने त्याच्या पाच मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा पुन्हा अत्याचार केले. पोलिसांमध्ये जर तक्रार केली तर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी तो देत होता. २० फेब्रुवारी २०२० पासून तर २०२१ पर्यंत म्हणजे तब्बल एक वर्ष महिलेसोबत हा प्रकार सुरू होता अखेर महिलेच्या वडिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आणि आरोपी पती आणि त्याच्या पाच मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
उपलब्ध माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 23 वर्षीय मुलीचा विवाह 2016 मध्ये झालेला होता त्यानंतर 2020 मध्ये ते त्यांच्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आले त्यावेळी आरोपी पती आणि त्याचे चार मित्र यांनी सत्तावीस फेब्रुवारी 2020 रोजी तिला घराबाहेर बोलवले आणि एका ठिकाणी घेऊन जात सर्वांनी तिच्यावर अत्याचार केले अशी माहिती महिलेने वडिलांना दिली.
फिर्यादींच्या म्हणण्याप्रमाणे सदर प्रकाराचे आरोपींनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर 2020 पासून तर 2021 पर्यंत वरील सर्व आरोपी अशाच पद्धतीने तिला घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत असायचे. जर पोलिसांपर्यंत प्रकरण नेले तर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची देखील धमकी तिला देण्यात आलेली होती असे फिर्यादीत म्हटलेले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.