युवराज पाटील सेट परीक्षा उत्तीर्ण

दनोली:प्रतिनीधी

दि:०३:जुलै:दानोळी येथील युवराज आण्णासाहेब पाटील हे मार्च २०२३ मध्ये सहाय्यक  प्राध्यापक करीता घेण्यात आलेल्या राज्य पात्रता (सेट) परिक्षा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले

. त्यांनी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातून यश प्राप्त केले. ते सध्या

शरद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ग्रंथपाल पदावर कार्यरत आहेत.

तसेच सांगलीच्या श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय अंतर्गत घेण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र पदवीसाठी समंत्रक (शिक्षक) म्हणून

कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे, त्यांचे ग्रंथालय

शास्त्रातील गुरु, सहकारी, मित्र, कुटुंबिय यांचे सहकार्य मिळाले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.