श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल मध्ये कायदेविषयक व्याख्यान

इचलकरंजी:प्रतिनीधी

दि:१३:जुलै:महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व इचलकरंजी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी मध्ये पोक्सो ऍक्ट मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य श्री आर एस पाटील सर यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका मा. गोंदकर मॅडम यांनी स्वागत केले. त्यानंतर ऍड. दत्तात्रय बडे साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. यानंतर ऍड. शहानवाज पटेल साहेब यांनी protection of children sexual offence act याची संकल्पना स्पष्ट केली. यानंतर ऍड. मेहबूब बाणदार साहेब यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सर्व मुलींना सौम्य व गंभीर स्वरूपाचे गुन्हे व त्या साठीच्या शिक्षा कोणत्या दिल्या जातात याची कल्पना दिली. यासाठी कोण कोणती कलमे वापरली जातात हे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड शिवराज चुडमुंगे तसेच ऍड तौफिक जमादार उपस्थित होते. कार्यक्रमास मनोगत पर आभार मा. गोंदकर मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्री शहा सर यांनी केले या कार्यक्रमास सर्व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.