मिरजेसाठी रेल्वेचा स्वतंत्र विभाग करण्याची मागणी
मिरज:प्रतिनिधि.
दि:३०:जुलै: मिरज रेल्वे स्थानक पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे स्थानक असून मिरजेसाठी स्वतंत्र विभाग जाहीर करण्यात यावा अशी मागणी जनसुराज्य शक्तीचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी एका निवेदनाद्बारे रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेले मिरज स्थानक महत्वाचे स्थानक असून यापुर्वी हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे होते.
मात्र, त्यानंतर हे स्थानक पुणे विभागात समाविष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणाहून माल वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूकही मोठी असून या स्थानकासह बेळगाव, कुर्डुवाडी, सातारा, या सर्व स्थानकासाठी मिरज विभाग स्वतंत्रपणे कार्यरत करण्यात यावा अशी मागणी श्री. समित कदम यानी निवेदनाद्बारे केली आहे. तसेच मिरज स्थानकावरून गोवा, कलबुर्गी, पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात यावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.