सांगली प्रतिनिधि
दि:२: सप्टेंबर: भाजप सत्तेत आल्या पासून देशात हुकूमशाही सुरू असून राजरोसपणे मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे मशिद -दर्गा वाद निर्माण केले जात आहेत लव-जिहाद च्या नावाने मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे .इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्यासाठी मोर्चेआंदोलने करण्यात आल्या. टिपू सुलतान- औरंगजेब चे स्टेटस वरून दंगली घडून आणल्या.. हिंदू राष्ट्रासाठी मोठ्या सभा घेण्यात आल्या पुरोगामी चा किल्ला ओळखला जाणाऱ्या कोल्हापूर सारख्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या मुस्लिमांच्या नरसंहाराची भाषा खुलेआम करण्यात आले त्यांच्यावर कोणतेही कारवाई झालेली नाही
या घटनांचा विचार करून पश्चिम महाराष्ट्रासाठी मुस्लिम नेतृत्व देण्याचा विचार चालू असून पश्चिम महाराष्ट्रासाठी एक उमेदवार मुस्लिम लीग ला देण्याचा विचार चालू आहे व तशी मागणी इंडियन इंडियन मुस्लिम लीगचे खासदार व अध्यक्ष कादर मोहिद्दीनसाहब व सय्यद सादिक अली थंगल यांनी राहुल गांधी यांच्याकडे केलेली आहे लवकरच उमेदवार जाहीर केला जाईल अशी माहिती मुस्लिम लीग चे प्रदेशउपध्यक्ष महाराष्ट्र राज्य अॅडहोकेट जमिर खानजादे यांनी सांगितले .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.