4 सप्टेंबर रोजी इचलकरंजी भारतीय जनता पार्टी नूतन कार्यालयाचा उद्घाटन सोह
इचलकरंजी .कयूम शेख
दि. १ इचलकरंजी भारतीय जनता पार्टीच्या भव्य कार्यालयाचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा आयोजित केला असून सदर कार्यक्रमास मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण, खोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२३रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. आम. श्री. सुरेशराव हाळवणकर असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यसभा सदस्य मा. श्री. खासदार धनंजय महाडिक आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष मा. श्री राजवर्धन नाईक निंबाळकर हे प्रमुख उपस्थिती असणार आहेत. असे कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपा शहराध्यक्ष व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी सांगितले.
०६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पक्ष स्थापने पासून आज पर्यंत इचलकरंजी भाजपचे एकूण १४ अध्यक्ष झाले. शहरांमध्ये स्वतः चे पक्ष कार्यालय असावे यासाठी कार्यकत्यांनी १९८३ साली भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने निधी गोळा करून व कार्यकत्यांच्या परिश्रमाने कार्यालय खरेदी केली. एक छोटंसं रोपट लावले होतं त्याचं आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. जसे जसे कार्यकर्ते वाढत गेले तस तसे पक्ष कार्यालयाची व्याप्ती वाढत गेली.
१९८३ ला पश्चिम महाराष्ट्रात पुणे नंतर इचलकरंजीचे स्वमालकीचे भाजप कार्यालय स्थापन झाले. देशभर पक्ष वाढीसाठी, संघटन मजबुत करण्यासाठी फिरत असताना या नुतनीकरण केलेल्या कार्यालयात भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व. प्रमोद महाजन, स्व गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, विनोद तावडे असे अनेक नेते मंडळी यांचे निवास म्हणून वापर केला व पक्ष संघटन मजबूत केले. इचलकरंजी शहरामध्ये जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रवास करत असताना पक्षाच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने, मोर्च्याच्या माध्यमातून विधायक कामे करून सामान्य जनतेला न्याय द्यायचे काम केले. भारतीय जनता पक्षामार्फत काम करत असताना आणीबाणीच्या काळात, राम मंदिर आंदोलन अशा अनेक प्रसंगी इचलकरंजीचे सर्वाधिक कार्यकर्ते जेलमध्ये गेले होते. अशा या ऐतिहासिक वास्तूचे आधुनिक नूतनीकरण करण्याचा मानस शहराध्यक्ष अनिल डाळ्या व त्याच्या सर्व पदाधिकारी यांनी प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरविला व त्याला आज मुहूर्तस्वरूप प्राप्त झाले. या कार्यलयाच्या उद्घाटन सोहळ्यास सर्व भाजपा कार्यक पदाधिकारी आजी माजी नगसेवक व इचलकरंजी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे अ आवाहन शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांनी केले आहे या पत्रकार बैठकीस भाजपा जेष्ठ नेते मिश्रीला जाजू, पांडुरंग म्हातुकडे, महिला अध्यक्ष सी. पूनम जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण पाटील, सरचिटण अरुण कुंभार शहाजी भोसले, अमृतमामा भोसले, उमाकांत दाभोळे, प्रदीप मळगे, उत्तमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.