आयुष्मान भव’ मोहिमेंतर्गत ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

  सांगली: प्रतीनिधी 

 दि. 2 नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘आयुष्मान भव’ मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थींचे ई-गोल्डन कार्ड काढण्यास आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आयुष्मान भव’ मोहिमेसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्यासह जिल्ह्यातील पंचायत समितीत्यांचे गट विकास अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, सामान्य माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्मान भव’ ही योजना अत्यंत उपयुक्त व महत्त्वाची आहे. या योजनेच्या व्यापक प्रचार  व प्रसारासाठी आरोग्य  विभागाने  प्राधान्य द्यावे. गावातील रेशन दुकान व ग्रामपंचायतीमध्ये  योजनेच्या लाभाबाबतचे फलक लावावेत. लाभार्थीचे ई-गोल्डन कार्ड काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य विभागाच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांना लाभार्थी कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देऊन याचा नियमित आढावा  घ्यावा.  गट विकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक व संबंधितांची बैठक घेऊन  ‘आयुष्मान भव’ मोहिमेतून ई-गोल्डन कार्ड काढण्याचे काम यशस्वी करावी.

            आरोग्य विभागाने  जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन कार्डधारकांची माहिती घेऊन त्यानुसार लाभार्थीचे कार्ड काढण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे सांगून जिल्ह्यातील जनतेला आरोग्याच्या सेवा सुविधा उपलब्ध होणार असल्याने या योजनेच्या लाभासाठी सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केले.

            प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी आयुष्मान भव’  मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या  कामकाजाची माहिती दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.