शरद इंजिनिअरिंगच्या ९ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून निधी

यड्राव,:राम आवळे 

दि १: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ
इंजिनिअरिंगमधील मेकॅनिकल विभागातील नऊ प्रोजेक्टना टाटा टेक्नॉलॉजीकडून १
लाख ३५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
टाटा टेक्नॉलॉजी प्रत्येक वर्षी इनोव्हेटीव्ह प्रोजेक्टचे परिक्षण करुन त्यांना रेडी
इंजिनिअर अंतर्गत निधी देते. गोकुळ शिरगांव मॅन्युपॅक्चरिंग असोसिएशन
(गोशिमा) यांच्या मार्फत प्रोजेक्टचे परिक्षण केले जाते. महाविद्यालयातील स्पॉन्सर्ड
प्रोजेक्टचे प्रेझेंटेशन घेवून त्यातील प्रोजेक्टची निवड करुन त्यांना निधी दिला
जातो. शरद इंजिनिअरंगमधील २० प्रोजेक्टमधून ९ प्रोजेक्टना निधी मंजूर झाला
आहे.
यामध्ये इम्पलिमेंटींग पोका-योका अॅटोमेशन फॉर व्हॅरिएबल कि वे अॅगल लेसर
प्रिटींग ऑन मल्टी युज कंपोनेंट, डिझाईन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ अलगी पॅनल
फॉर जनरेटींग बायोमास इलेक्ट्रीसिटी अॅण्ड बायोफ्युअल अॅज अ बाय प्रोडक्टस,
डिझाईनिंग अॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एसीसी ब्लॉक पुशिंग मेकॅनिझम,
एस्पेरिमेंटल इनवेस्टिंगेशन ऑफ अ पीसीएम हिट सिंक फॉर इलेक्ट्रॉनिक थर्मल
मॅनेजममेंट, अॅक्टीव्ह प्रोस्थेटीक अॅकंल अॅण्ड अडेप्टीव्ह इक्वीपमेंट फॉर बाइक
राइडिंग इन लोअर लिंब एम्पटीज, डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ अॅटो टरेट
अॅटो फोकस युजिंग एआय फॉर माक्रो विकर्स हार्डनेस टेस्टर, डिझाइन अॅण्ड
डेव्हलपमेंट ऑफ अ मेकॅनिजम फॉर प्रिप्रोसेसिंग ऑफ रेझीन्स, डिझाइन अॅण्ड
डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ क्लिनिंग मेकॅनिझम फॉर मेम्बरन बाय युसिंग अल्ट्रासोनिक
अॅण्ड व्हॅब्रटिंग मेकॅनिजम टु रिड्युस फाऊलिंग, बॅटरी थर्मल मॅनेजमेंट सिस्टिम
युजिंग थर्मोइलेक्ट्रीक जनरेटर ह्या नऊ प्रोजेक्टचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना डॉ. सागर पाटील, डॉ. अदिक टकले, डॉ. सुयोग पाटील, प्रा.
ए.एस.एन. हुसेनी, प्रा. एस.पी. उदगांवे, प्रा. एस. बी. हेरवाडे यांनी मार्गदर्शन
केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व
एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.