गंगामाईच्या समीक्षा मिठारी, रोझा कलावंत , श्रावणी मळोद, सादिया फकीर , स्नेहा बसूदे यांची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड –
इचलकरंजी-
श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या समीक्षा काशिलिंग मिठारी, रोजा समीर कलावंत, श्रावणी दत्तात्रय मळोद, सदिया जमालशाह फकीर, स्नेहा नागेश्वर बसूदे या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या जळगाव येथील निवड चाचणीसाठी 18 वर्षाखालील गटात हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा अंतर्गत निवड चाचणीसाठी निवड झाली आहे. या सर्व मुली श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. पालकांचे प्रोत्साहन व शाळेचे पाठबळ यामुळे त्यांना हे यश संपादन करणे शक्य झाले.श्री ना. बा.एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासी बोहरा शेठजी , चेअरमन श्री कृष्णाजी बोरा , व्हाईस चेअरमन श्री.उदय लोखंडेसो , सेक्रेटरी श्री.बाबासाहेब वडिंगेसो, स्कूल कमिटी चेअरमन श्री. मारुतराव निमनकर या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच प्रशालेमार्फत त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील खेळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना क्रीडा विभाग प्रमुख प्रा.शेखर शहा यांचे प्रशिक्षण लाभले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर, उपमुख्याध्यापिका एस एस भस्मे , पर्यवेक्षक श्री एस .व्ही.पाटील व क्रीडा शिक्षक राहुल कुलकर्णी यांचे सर्व मुलींना विशेष मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.