डॉ .बाबासाहेब आंबेडकर सभाग्रहाचे उदघाटन येत्या 14 एप्रिल रोजी करा अन्यथा आंदोलन करणार!

आंबेडकरी मध्यवर्ती समितीचा इशारा.......

इचलकरंजीविजय मकोटे 

दि ‘७: महानगरपालिका मार्फत उभारणेत येणाऱ्या  डॉ .बाबासाहेब  आंबेडकर सभाग्रहाचे काम ताबडतोब पूर्ण करून येत्या 14 एप्रिल रोजी त्या सभाग्रहाचे उदघाटन करावे अन्यथा मनपा विरोधात आंबेडकरी मध्यवर्ती समिती मार्फत उग्र आंदोलन उभारणेत्त येईल असे  निवेदन महापालिकेचे उपायुक्त ठेंगळ याना  देण्यात आले. या निवेनाद्वारे मनपाच्या  मागासवर्गीय  निधीमधून भारतीय सविधान प्रती मागासवर्गीय समाजातून वाटप कराव्यात.तसेच शहृरातील मोठ्या तळ्याची डागडुजी करीत असताना महाड चवदार तळ्याची प्रतिकृती उभारणीत यावी अशीही मागणी मनपाकडे केली आहे या शिष्टमंडळाचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार डी एस डोने यांनी केले होते .या शिष्ट मंडळात महासचिव बी,जी,देशमुख, उपाध्यक्ष पत्रकार रामभाऊ ठीकणे,प्रल्हाद सावंत विश्वास फराडे,सौ .वैशाली  कांबळे.प्रा.भारत कांबळे.राजू मोहिते आदी सह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.