इचलकरंजी ऑन ड्युटी होमगार्डच्या कुटुंबांना पोलीस दलाने दिले आर्थिक साह्य

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी

दि .येथील  इचलकरंजी पथकातील होमगार्ड विष्णू भोळे हे मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी बंदोबस्तासाठी गेले असता त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. अशावेळी सर्वच पोलीस दल होमगार्ड दल व इतर बंदोबसाठी असणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला होता .त्यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे  पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पुढाकार घेऊन त्यांना योग्य ती मदत करून शासकीय इतेमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार इचलकरंजी येथे करण्यात आले.

भोळे यांची परिस्थिती हालाकीची असल्याची समजल्याने सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस दलाने भरीव आर्थिक निधी भोळे यांच्या कुटुंबांना दिली .तसेच पंतप्रधान व्हीआयपी या व्हाट्सअप ग्रुपच्या मार्फत रु.१ लाख१८हजार इतकी भोळे यांची पत्नी व मुलगा यांच्याकडे अप्पर पोलीस अधीक्षक तथा समापदेशक अधिकारी होमगार्ड जयश्रीताई देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी शिवाजीनगर पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, शहापूर पोलीस निरीक्षक  श्री. भुजबळ, होमगार्ड जिल्हा कार्याचे अधिकारी दिलीप हजारे ,वरिष्ठ लिपिक कमलाकर काशीद, हातकणंगले तालुका पथकाचे समादेशक अधिकारी पापालाल सनदी,अजिंक्य कुलकर्णी
व्ही व्ही साळवे,मुकेश शेंगुशिकर.यशवंत पवार,संजय देसाई,गजानन भोसले,संजय बोरगे,जयसिंग पडियार इचलकरंजी उपपथकाचे अधिकारी संजय वडिंगे, प्रमोद कांबळे, निपाणे, प्रकाश कोरवी व इतर होमगार्ड उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.