इचलकरंजीत दि. 04 ते 08 जानेवारी 2024 रोजी रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी

दि. १ जानेवारी २४ :रोटरी ट्रेडफेअर से प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्यावतीने व माध्यम प्रायोजक दै महासत्ता यांच्या सहकार्याने 04 से 08 जानेवारी 2024 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक केएटीपी ग्राउंड या इचलकरजीतील मध्यवर्ती ठिकाणी सकाळी 10 से रात्री 10 पर्यंत भव्यपणे साकारत आहे .या वर्षींचे रोटरी ट्रेडफेअरचे 23 वे वर्ष आहे इचलकरंजीच्या एकमेव पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लागणारे हे प्रदर्शन याही वर्षी दिमाखात साकारणार आहे. इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे

या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तू, इलेक्ट्रीकल वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, गारमेंट मशिनरी, वॉटर प्युरिफायर, लेडीज व जेंट्स डेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी, एज्यूकेशन, सोलर,अ अॅक्युप्रेशर बॉडी मसाज, व्यायामाची साधने, आयुर्वेदीक उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, विविध प्रकारचे मसाले इ. चे स्वतंत्र विभाग मांडणेत येणार आहेत. विविध कंपन्या व फर्म यांचे स्टॉल्स यामध्ये न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, शिवम इंटरप्रायजेस, माइ हुंडाई कार, यामाहा बाईक निकम, सुशितो इंटरप्रायजेस (मशिन इविवपमेंट), श्री फर्निचर, अर्बन रूफिंग सिस्टीम, सोलर टेक्नोलॉजी, एल.आय.सी. ऑफ इंडीया, निटींग अॅन्ड गारमेंट इंडस्ट्रियल, किचन ट्रॉलीज, युरेका फोबस, सुर्या वॉटर असे नामांकीत स्टॉल्स आहेत.

खवय्यांसाठी शुध्द शाकाहारी अत्यंत लज्जतदार व हायजेनिक पद्धतीने बनविलेले खादयपदार्थाचे विविध प्रकार असून फूड स्टॉल असणार आहेत. आईस्किम, फूट स्टॉल तसेच मनोरंजनाचे विविध कार्यकम, मुलांच्याकरिता मिनि वर्ल्ड असणार आहेत. ट्रेड फेअर पाहण्यास येणा-या नागरिकांकरीता प्रवेश कुपनवर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

यावेळी महिलांच्या करीता विविध स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे. यामध्ये दि. 05/01/2024 रोजी दुपारी 3 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क येथे रांगोळी स्पर्धा, 06/01/2024 रोजी दुपारी 3 वाजता केओटीपी ग्राउंड येथे अरेबियन मेहंदी स्पर्धा, – 07/01/2024 दुपारी 3 वाजता केओटीपी ग्राउंड येथे पाककला स्पर्धा यामध्ये दळापासून गोड व तिखट पदार्थ बनविणे या स्पर्धा होतील. स्पर्धकांनी आपली नावे गोळी स्पर्धेकरीता 9011011881, मेहंदी स्पर्धेकरीता 9922240990, पाक-कला स्पर्धेकरीता 8714673 या मोबईल नंबरवर संपर्क करावा.यातून मिळणारी रक्कम ही वर्षभर विविध समाजउपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते. गरजू लोकांना मदत, प्लॅस्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कॉम्प्युटर, बेचेस स्वच्छतागृह, पोलिओ निर्मूलन, वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, व्होकेशनल अवार्ड, शालेय विद्यार्थी व युवकांकरीता विविध कला-किडा स्पर्धाचे आयोजन, महिलाना स्वावलंबनासाठी मदत, शालेय मुलांना सायकलीचे वितरण, दिव्यांगासाठीचे कार्यकम, विविध वक्त्याची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलने, मोतिबिंदु शस्त्रक्रिया व विविध वैदयकीय तपासणीद्वारा गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व इतर उपकम घेतले जातात.

या प्रदर्शनामध्ये स्टॉलची सुबक मांडणी केली असून, नागरिकाना प्रदर्शन पाहणेकरिता रुंद व प्रशस्त जागा, आधुनिक भव्य मंडप, संपूर्ण परिसर मेंटीनने आच्छादित तसेच चोविस तास विशेष सुरक्षा व सीसीटीव्ही (cctv) दररोज स्टेज शो, कराओके गाणी. मिमिकी चे उत्कृष्ठ कार्यकम, आकर्षक बक्षिसांची लकी ड्रॉ इ. चे आयोजन ही यावर्षीची खास वैशिष्टे आहेत.

इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते, संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवणेची ही इचलकरंजीतील एकमेव व उत्तम पर्वणी आहे. स्टॉल बुकींगकरिता रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन रो. महादेव खारगे (9822665858), रो संजय खोत (9422412346), रो. रविंद्र नाकील (9422461000), रो. संजय घायतिडक (9326605212) रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुन (9422582420) सेक्रेटरी रो. पंकज कोठारी (9823095907), बॅनर जाहीरात साठी रो. राज पाटील (9822535300) यांच्याशी संपर्क साधावा.

या पत्रकार परिषदेस रोटरीचे अध्यक्ष सुनिल सातपुते, सेक्रेटरी पंकज कोठारी , रोटरी ट्रेडफेअरचे चेअरमन महादेव खारगे सेकेटरी – संजय घायतिडक, प्रोजेक्ट को चेअरमन सुभाष तंगडी, संजय खोत, मनिष मुनोत, नेमिनाथ कोथळे, वसंत पाटील, महेंद्र मुथा, सुशिल माहेश्वरी, शरद देसाई,अजित कुरडे, गिरीष बदाणी, पिरगोंडा (राजु) पाटील श्रीनिवास दबडे आदी सदस्य उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.