सांगली:प्रतिनिधी
दि:०३:Jan: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे गुरूवार दि. 4 जानेवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 4 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. रात्री 9.15 वाजता महात्मा फुले चौक मिरज येथे दिवंगत श्री. विवेक कांबळे यांच्या कुटूंबियांची सांत्वनपर भेट. रात्री 10 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार, दि. 5 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, समाजकल्याण अधिकारी यांच्यासमवेत बैठक. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद व तद्नंतर शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. सायंकाळी 5.30 वाजता कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथनगर सांगली येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता पुणेकडे प्रयाण.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.