महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षपदी कॅप्टन हनिफभाई खलफे यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्षपदी कॅप्टन हनिफभाई खलफे यांची नियुक्ती

कडवई:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कसबा येथील कॅप्टन हनिफभाई खलफे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. हनिफभाई यांनी यापुर्वी देखील काँग्रेस पक्षाकडून अनेक पदे भूषविली आहेत.

 

पक्षाध्यक्ष मा. खा. मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आदरणीय नेत्या मा. खा. सोनियाजी गांधी व मा. राहुलजी गांधीं यांचा दृष्टीकोन,उद्दिष्ट व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे कार्य आपल्या कर्तुत्वाने पार पाडेन असे खलफे म्हणाले.

Indian General Store Kadwai, order.. 9860153462..extra delivery charges

 

सामाजिक न्याय विभाग प्रदेश प्रमुख दीपा चक्रबोर्ती यांच्या हस्ते कॅप्टन हनिफ खलफे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. समाजातील वंचित घटकांना काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कॅप्टन हनीफ खलफे यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मुजीब खान यांनी कॅप्टन खलफे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.