केंद्र प्रमुख अशोक टाकळे सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पार
कडवई :-मुजीब खान
अशोक सीताराम टाकळे केंद्रप्रमुख चिखली १, अजिर वाघमारे उपशिक्षक शाळा चिखली बौद्धवाडी यांचा सत्कार समारंभ चिखली शाळा नं.१ या ठिकाणी पार पडला .केंद्र प्रमुख अशोक टाकळे सर दि.३०/०९/२०२१ रोजी शासकीय सेवेतून निवृत्त होत झाले . यानिमित्ताने चिखली केंद्र शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थ यांच्या वतीने दि.२९/०९/२०२१ रोजी त्यांचा सेवापुर्ती सदिच्छा समारंभ शाळा चिखली १ येथे करण्यात आला.
श्री अशोक टाकळे सर एक अत्यंत हुशार, कार्यतत्पर, उत्तम प्रशासक आहेत.अगदी उपशिक्षक, पदवीधर शिक्षक, केंद्रप्रमुख अशी तीनही पदावर कार्यरत असताना त्यांनी नेहमीच स्वतः पेक्षा कर्म, वक्तशीरपणाला महत्व दिले.. अगदी नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कार्य सुरूच ठेवले.अशा या उतुंग व्यक्तिमत्त्वास सेवापूर्ती निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.. व भावी आयुष्य आरोग्यदायी व सुखकर लाभो हीच सदिच्छा.याच सोबत शांत, संयमी, तितकेच कार्यतत्पर श्री अजिर वाघमारे सर शाळा चिखली बौद्धवाडी हे देखील मार्च महिन्यात सेवा निवृत्त झाले होते. कोरोना कालावधीमुळे त्यांचा देखील आज चिखली केंद्राच्या वतीने सदिच्छा समारंभ घेण्यात येवून त्यांना पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शाळेतील शिक्षक मोहिते गुरुजी यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.