कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश

कसबा हायस्कूलचे एच.एस.सी. परीक्षेत उज्ज्वल यश

संगमेश्वर:

   संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित, न्यू इंंग्लिश हायस्कूल ॲण्ड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या प्रतीथयश कनिष्ठ महाविद्यालयाने फेब्रुवारी- मार्च 2024 बोर्डाच्या परीक्षेत उत्तम यश मिळवत एचएससी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून तिन्ही शाखांचा निकाल 100% लागला आहे.प्रशालेतील परीक्षेस प्रविष्ठ

Indian General Store Kadwai.. For order.. 9860153462

एकूण विद्यार्थी- 193
पैकी उत्तीर्ण विद्यार्थी193
शाळेचा एकत्रित निकाल100%

*वाणिज्य शाखा*
परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी 65
उत्तीर्ण विद्यार्थी -65
निकाल- 100%

गुणानुक्रमे तीन विद्यार्थी –
*प्रथम क्रमांक सानिया सखाराम शिगवण-91.83%*
*द्वितीय क्रमांक मिनाक्षी दीपक वेद्रे – 88.00%*
*तृतीय क्रमांक सृष्टी विजय बेटकर – 86.83%*

*विज्ञान शाखा*
परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी – 69
उत्तीर्ण विद्यार्थी -69
निकाल – 100%

गुणानुक्रमे तीन विद्यार्थी –
*प्रथम क्रमांक जुवेरिया रईस शेख – 77.83%*
*द्वितीय क्रमांक ध्रुव चंद्रशेखर ब्रीद -74.83%*
*तृतीय क्रमांक झिया रहमतल्ला मुकादम-71.17%*

*कला शाखा*
परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी – 59
उत्तीर्ण विद्यार्थी – 59
निकाल – 100%

*गुणानुक्रमे तीन विद्यार्थी -*
*प्रथम क्रमांक सानिका सचिन जंगम -79.00 %*
*द्वितीय क्रमांक चैतन्य रमेश टोपरे – 70.67%*
*तृतीय क्रमांक सुरज संतोष पाताडे -68.33%*

          संस्थेच्या मार्गदर्शनमुळे शिक्षकांना नवनवीन अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळाले.त्यामुळेच आजचे यश मिळू शकले यात शंका नाही.संस्थेच्या भक्कम पाठिंब्याने व प्राचार्या सौ.एल.एन.मणेर मॕडम यांच्या कुशल नेतृत्वाखाली कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व अध्यापक वर्गाच्या कठोर मेहनतीचे फळ म्हणून या यशाकडे पाहिले जात आहे.

     एच.एस.सी बोर्डाच्या परीक्षेत शाळेने गेल्या अनेक वर्षापासून मिळवत असलेल्या सातत्यपूर्ण उज्ज्वल यशासाठी सर्व यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष कॕप्टन अकबरसाहेब खलपे,उपाध्यक्ष नियाजसाहेब कापडी,उपाध्यक्ष इब्राहिमसाहेब काझी,सचिव सईदसाहेब उपाध्ये,सहसचिव शौकतअलीसाहेब खलफे,खजिनदार शुकूरसाहेब गैबी,सर्व माननीय संस्था सदस्य,विद्यालयाच्या प्राचार्या सौ.एल.एन.मणेर मॕडम,सर्व पालक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.