एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल व दि कडवई इंग्लिश स्कूलची एसएससी परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम

एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल व दि कडवई इंग्लिश स्कूलची एसएससी परीक्षेत 100% निकालाची परंपरा कायम
कडवई:

     मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल बोर्डाकडून आज आॕनलाईन जाहीर झाला असून त्यामध्ये एज्युकेशन सोसायटी कडवई संचलित दि कडवई इंंग्लिश स्कूल व महाराष्ट्र ऊर्दू हायस्कूल कडवई-संगमेश्वर, जि. रत्नागिरी या विद्यालयाचा एकूण निकाल 100% लागला असून त्यात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.

   प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शाळेने उत्तम कामगिरी पार पाडल्याने शाळेचे अभिनंदन होत आहे.एज्युकेशन सोसायटी कडवई ही संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी नामचीन आहे.राज्यातीलच नव्हे तर परराज्यातील मुलांना शिक्षण व्यवस्थेत सामावून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी देण्याचे कार्य संस्था नेहमीच करते. त्याचबरोबर व्यवसाय मार्गदर्शनाचे सत्र आयोजित करून विद्यार्थ्यांचे भविष्यही सुरक्षित करण्यात संस्था मोलाचे योगदान देत आहे.शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्था व शाळा नेहमीच प्रयत्नशील असते.विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करत शाळेपर्यंत पोहोचावे लागते.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

   ऊर्दू हायस्कूल मध्ये परीक्षेत एकुण 27 विद्यार्थी बसले होते.शाळेचा निकाल 100%

*विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी- 5*

*प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण विद्यार्थी -16*
*दृत्तीय श्रेणी उत्तीर्ण विद्यार्थी     -6*

*गुणवंत विद्यार्थी*

*प्रथम- नवीद रिजवान कारिगर – 95.20 %*

*द्वितीय- पटेल समद-88.40%*

*तृतीय – रिम शेख –  81.20%*

*दि कडवई इंग्लिश स्कूल*
*एकुण विद्यार्थी:12*
*प्रथम श्रेणी:9*
*दृत्तीय श्रेणी:3*
*गुणवत्ता विद्यार्थी*
*प्रथम:निलम वैष्णव 72.60%*
*दृत्तीय:झैनब खान 69.20%*
*तृतीय:अथर्व किंजळकर आणि अफ्सिया कडवईकर 67.60%*

      संस्थेचे उत्तम सहकार्य व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन, प्राचार्या रिजवान कारिगर यांचे उत्तम नियोजन व कार्यक्षम प्रशासन,सर्व शिक्षकांचे अभ्यासपूर्ण अध्यापन,विद्यार्थ्यांचे अविरत कष्ट, नियमित जादा तासिकांचे आयोजन, प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व भरपूर सराव परीक्षा या सर्व बाबींमुळेच हे यश मिळू शकले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष मा.सादीक काजी,उपाध्यक्ष डॉ.अन्सार जुवळे, सर्व कमिटी सदस्य,जमातुल मुस्लिमिन कडवई, पत्रकार मुजीब खान, मुख्याध्यापक कारिगर सर, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक प्रांजल मोहिते सर्व शिक्षक,पालक यांनी अभिनंदन केले.दोन्ही शाळेने संपादन केलेल्या सातत्यपूर्ण व उत्तम यशासाठी पंचक्रोशीत विविध स्तरातून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.