लहान गटात गणेश साळुंखे तर मोठ्या गटात यश बेलेकर यांचा बैल प्रथम

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि १८ :येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत शनिवारी झालेल्या लहान गटात गणेश विष्णु साळुंखे यांच्या बैलाने 30.9 सेकंद अशी वेळ नोंदवत तर यश उत्तम बेलेकर यांच्या बैलाने 32.4 सेकंद अशी वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकविला. त्याचबरोबर सुट्टा बैल पळविणे शर्यतीत बादल ग्रुपने प्रथम क्रमांक मिळविला.
दरम्यान, 21 जून रोजी श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचे भव्य असे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. लहान गटात बिलाल राजु पटवेगार यांच्या बैलाने 31.6 सेकंद व चंद्रकांत गजानन सातपुते यांच्या बैलाने 32.4 सेकंद अशी वेळ नोंदवत अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविला. मोठ्या गटात दीपक वसंत पाटील (33.0) यांच्या बैलाने द्वितीय तर चंद्रकांत अशोक बंडगर (33.7) यांच्या बैलाने तृतीय क्रमांक मिळविला. सुट्टा बैल पळविणे स्पर्धेत हरीष खरात यांच्या बैलाने 29.49 सेकंदाची तर उमेश किरण कोळेकर यांच्या बैलाने 29.66 सेकंदाची वेळ नोंदवत द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
येथील डीकेटीई नारायणमळा प्रशालेच्या पटांगणावर लहान व मोठ्या गटातील लाकूड ओढण्याच्या तसेच सुट्टा बैल पळविणे शर्यती पार पडल्या. लहान गटात 43, मोठ्या गटात 12 तर सुट्टा बैल पळविणे शर्यतीत 60 बैलांची नोंद झाली होती. शासन नियमांचे पालन करुन शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. कोणताही गोंधळ वा अनुचित प्रकार घडू नये तसेच शर्यतीचा आनंद सर्वांचा लुटता यावा यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
प्रगतशील शेतकरी अजित देवमोरे, काशिनाथ गोलंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते मैदान व लाकूड पुजन करण्यात आले. शर्यती पाहण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती. 22 जून रोजी जुनी गावचावडी गावभाग येथे होणार्‍या पारंपारिक कर तोडण्याच्या दिवशी सर्वच गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत.
यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, नायब तहसिलदार संजय पुजारी, तलाठी श्री. शिंदे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, अहमद मुजावर, डॉ. विजय माळी, शांताप्पा मगदूम, पापालाल मुजावर, राहुल घाट, गजानन लोंढे, बाबासो पाटील, रफिक कलावंत, तानाजी भोसले, शिवाजी काळे, राजेंद्र बचाटे, शिवाजी माळी, बाबु रुग्गे, सागर मगदूम, बजरंग कुंभार, राजू दरीबे,  किशोर पाटील, सागर कम्मे, इरफान अत्तार, सागर गळदगे, विजय पोवळे, अर्जुन पाटील, नितीन वाघमोरे आदींसह असंख्य शर्यतप्रेमी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.