धक्कादायक! इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात मद्यधुंद गुंडाचा धिंगाणा – ‘मी मोठा सिंघम’ म्हणत पोलिसांनाच दिलं आव्हान!

 

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी 

दि. 29:गावभाग पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका मद्यधुंद गुंडाने थेट दोन चाकी वाहन घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश करत दहशत माजवली. “मी आहे मोठा सिंघम!” अशी आरोळी ठोकत संबंधित गुंडाने पोलिसांनाच आव्हान दिले. या प्रकारामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली.

या सर्व प्रकाराचं महालक्ष्मी टाईम्सच्या कॅमेऱ्यात ध्वनिचित्रण सुरु असताना संबंधित गुंडाने थेट महालक्ष्मी टाईम्सच्या संपादकाकडे मोबाईल देण्याची धमकी दिली आणि व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपादक महोदयांनी धाडसाने आणि कायद्यावर विश्वास ठेवत तिथल्या पोलिसांना त्यांच्या जबाबदाऱ्या बजावण्याची जाणीव करून दिली.

यानंतर, एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ धाडस दाखवत या मद्यधुंद गुंडाला ताब्यात घेतले आणि त्याला चांगलेच अद्दल घडवली. लगेचच इतर पोलीस कर्मचारी देखील पुढे सरसावले आणि गुंडास अटक करत पोलीस कोठडीत दाखल केले.

हा प्रकार इतक्यावरच थांबत नाही – गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्ती जर थेट पोलीस ठाण्यात शिरून दादागिरी करत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होतो. पोलिसांनाही जर अशा गुंडांकडून आव्हान दिलं जात असेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

समाजात भीती निर्माण करणाऱ्या गुंडांना आता कायद्याच्या कचाट्यात ओढणं गरजेचं आहे. अशा घटना रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेने अधिक सजग राहण्याची गरज आहे.”पोलीस ठाण्यातच जर गुंड दहशत माजवतील, तर सामान्य माणूस कुठे जाईल?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून व्यक्त होत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.