डीकेटीई च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील २३ विद्यार्थ्यांची डॅनफॉस कंपनीत निवड
डॅनफॉस पॉवर सल्युएशन ही कंपनी मोबाईल हायड्रोलिक्स, इलेक्ट्रीफीएशन आणि स्मार्ट कंट्रोल सिस्टीम्स यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत करणारी अग्रगण्य डेन्मार्क येथील जागतिक कंपनी आहे. औद्योगिक, कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील उपकरणांच्या कार्यक्षमतेत वाढ करणा-या उपाययोजना ही या कंपनीची प्रमुख ताकद आहे.
डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागात उदयोगजगातातील गरजांचा अभ्यास करुन अभ्यासक्रम रचना केली आहे. यामध्ये पारंपारिक यांत्रिक ज्ञानाबरोबरच डिजीटल प्रोग्रॅमिंग, इंटरडिसीप्लीनरी प्रोजक्टस आणि इंडस्ट्री ओरिएंटेड ट्रेनिंगचा व त्याला अनुसरुन तांत्रिक ज्ञान यांचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थी केवळ तांत्रिक दृष्टया सशक्त होत नाहीत तर विविध क्षेत्रातील काम करण्यासाठी तयार होतात त्यामुळे विद्यार्थ्यांची अशा नामांकित कंपन्यांमध्ये निवड होण्यास मदत होत आहे.
डीकेटीईचे मेकॅनिकल विभागाचे माजी विद्यार्थी सध्या अनेक नामांकित कंपन्यामध्ये महत्वाच्या जबाबदा-यांवर कार्यरत आहेत. त्यांच्याशी आणि उदयोजगताशी मेकॅनिकल विभागाने निर्माण केलेले दृढ संबंध, तसेच विभागातील सातत्यपूर्ण गुणवत्ता हे या यशामागील मुख्य घटक आहेत असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव डॉ सपना आवाडे यांनी यावेळी काढले. तर ही निवड केवळ विद्यार्थ्यांच्या मेहनतीचेच नव्हे तर डीकेटीईच्या अभ्यासक्रमातील उदयोगाभिमुख दृष्टीकोनाचे आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणदृष्टीचे यश आहे यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ सौ. एल एस. अडमुठे यांनी मत व्यक्त केले.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालिका डॉ.सौ.एल.एस. आडमुठे, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ.व्ही.आर.नाईक, टीपीओ जी.एस. जोशी, कोऑर्डिनेटर डॉ बी.बी कबनुरे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील डॅनफॉस कंपनीत निवड झालेले विद्यार्थी
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.