इचलकरंजीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न
इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि. १५ जुलै:मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत १ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या १०० दिवस प्राधान्य कृती कार्यक्रमांतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात आज मंगळवार, दि. १५ जुलै रोजी पार पडलेल्या या शिबिरात शहरातील सुमारे ४०० स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. आपत्कालीन परिस्थितीत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या या स्वयंसेवकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिबिरात आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे यांनी स्वयंसेवकांना आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली आणि विविध शंका-समस्या यांचे निरसन केले.
कार्यक्रमास महानगरपालिका अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंखे, वाहन अधिक्षक प्रशांत आरगे, राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक शंकर पोवार, डि.के.ए.एस.सी. कॉलेजचे विनायक भोई, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूलचे मुल्लाणी सर, गोविंदराव हायस्कूलचे राहुल बुनांद्रे, B.S. यादव ॲकॅडमीचे यादव सर, माणूसकी फाउंडेशनचे रमल आमणे सर, पोलिस बॉईज असोसिएशनचे सतिश चव्हाण, वीर रेस्क्यू फोर्सचे रूपेश खरवार, A.J. फाउंडेशनच्या अबोली जीगजिनी मॅडम, तसेच मेकॅनिक अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याशिवाय महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील फायर जवान, शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराला प्रतिसाद दिला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.