रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त – तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : नियाझ खान
दि .३१ :– रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने २७ ऑगस्ट रोजी मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल ₹२८,४०,१६० किमतीचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, देवळे ते रत्नागिरी मार्गावर संशयित वाहन तपासणीदरम्यान एक पिकअप क्र. MH-10-CT-8366 ताब्यात घेण्यात आले. वाहनात शोध घेतल्यावर मोठ्या प्रमाणावर पान मसाला व सुगंधीत तंबाखू आढळून आला.
या वाहनाचा चालक व मालक सागर गंगाराम एकळकर (वय 28, राहणार ता. लोहारा, जि. उस्मानाबाद) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह वाहन मालक व इतरांविरोधात भादंवि कलम १२३ ,२७४, २२३, ( ५ ) तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जप्त मुद्देमाल:
एकूण १० पोते व विविध ब्रँडचे पान मसाला व तंबाखू
बाजारभावानुसार किंमत ₹२१,४०,१६० /-
वाहनाची किंमत ७०००००/-
एकूण जप्ती ₹ २८,४०,१६० /-या कारवाईत पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह पोलीस कर्मचारी श्री.ओगले , २५१ झोरे , ४७७ झोमणे , ३०१ पालकर १०६७ कदम , १२३८ खांबे , १३६२ सवाईराम १४१० दरेकर , ३०६ सावंत, २१५ कांबळे यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध पान मसाला व सुगंधीत तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.