रत्नागिरीत नापत्ता प्रकरणाचा उलगडा : प्रियकरासह तिघांना अटक
रत्नागिरी :नियाझ खान
दि.३१ :रत्नागिरी शहरातील नापत्ता युवती प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद, खंडाळा जंगमवाडी) याने दोन साथीदारांच्या मदतीने युवतीचा खून करून मृतदेह आंबाघाट परिसरात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नं. ७८ /२०२५ रोजी २१ ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आला होता. युवती नापत्ता झाल्यानंतर तिच्या भावाने संशय व्यक्त करत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नं.३६५/२०२५ क. १३८ BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर आरोपी दुर्वास दर्शन पाटील यास ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेत पोलिसांनी आरोपीकडून कबुलीजबाब मिळवला. आरोपीने 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या ‘सायली देशी बार’ येथे दोन साथीदारांच्या मदतीने कट रचून युवतीचा खून केल्याचे मान्य केले. तसेच मृतदेह आंबाघाट परिसरातील दरीत फेकून दिल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी ट्रेकरच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. आरोपी दुर्वास पाटील व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील करत आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.